वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › 19. प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग

अतंकाळी मी परदेशी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073449 · अभंग क्र. ८

8.
अतंकाळी मी परदेशी । ऐसे जाणोनि मानसी ।
म्हणोनिया हृषीकेशी । शरण मी तुज आलो ॥१॥
नवमास गर्भवासी । कष्ट झाले तया मातेसी ।
ते निष्ठुर झाली कैसी । अंती दूर राहिली ॥२॥
जीवी बापासी आवड । मुखी घालोनि करी कोड ।
जेव्हा लागली यमओढ । तेव्हा दूर टाकिले ॥३॥
बहिणी बंधुचा कळवळा । ते तू जाणसी रे दयाळा ।
जेव्हा लागली यमशृंखला । तेव्हा दूर राहिली ॥४॥
कन्या पुत्रादिक बाळे । ही तंव स्नेहाची स्नेहाळे ॥
तुझ्या दर्शनाहून व्याकुळे । अंती दूर राहिली ॥५॥
देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भुवनी ।
मी तंव जळतसे स्मशानी । अग्नीसवे एकला ॥६॥
मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानी परतले ॥
शेवटी टाकोनिया गेले । मजलागी स्मशानी ॥७॥
ऐसा जाणोनि निर्धार । मग मज आला गहिवर ।
तंव दाही दिशा अंधकार । मग मज कांही न सुचे ॥८॥
ऐसे जाणोनि निर्वाण पाही । मनुष्यजन्म मागुता नाही ।
नामा म्हणे तुझे पायी । ठाव देई विठोबा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग