वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

उदयी उदयी होता कृपा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088661 · अभंग क्र. ८

8.
उदयी उदयी होता कृपा दृष्टी ।
स्वये जगजेठी सेवा करी ॥१॥
सडासंमार्जन स्वये करी हरि ।
उदकते भरी गंध घासी ॥२॥
स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन ।
साधियेले जाण क्षणमात्रे ॥३॥
करोनि कवित्व एकादशी टीका ।
भागवत देखा हरिलीला ॥४॥
निळा म्हणे अपार करोनि अभंग ।
तोडिता उव्देग संसाराचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग