जन्मजन्मांतरी असेल प
8.
जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामुग्री ।
तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे ॥१॥
धन्य कुळ तयाचे रामनाम हेचि वाचे ।
दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणताचि ॥२॥
कोटी कुळांचे उद्धरण मुखी राम नारायण ।
रामकृष्णस्मरण धन्य जन्म तयाचे ॥३॥
नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी ।
तप केले असेल कोडी तरीचे नाम येईल ॥४॥
ज्ञानदेवी अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा ।
पूर्वज गेले वैकुंठा हरि हरि स्मरता ॥५॥
