संतपर
९.
संतपर
ब्रह्मीहून चंचले । त्या प्रयत्न न चले ।
मुरडिती सिनले । साधुसंत ॥१॥
मुरडिता मुरडे नाधेति त्या आघाटि ।
पाडति आव्हांटि । चौऱ्यासिस ॥२॥
धरूनिया बिज उगवति पडति ।
जन्म मरण सुति । फेरा त्यांला ॥३॥
भाजीलीया बिज मग वे उगवेना ।
म्हणोनि धरि जना साधु संग ॥४॥
सदगुरुचे संगति होय ब्रह्म प्राप्ति ।
सेख महमद पाई प्रीति पद्मनामा ॥५॥
१०.
भये आला के फकीर ॥
छाडी दुनियाकी फीकीर ॥१॥
आला नबिके तवकलि ॥
चिज न्या मत आवेलि ॥२॥
जालम नजीक जावे ॥
नसियत नतिज्या वावे ॥३॥
कली मारुचे पचे पीर ॥
हजरत मीरा साचे ॥४॥
सेख महमद मस्कूल ॥
लोलग्या बालेंबाल ॥५॥
११.
भोगा जाभीगा वेगळा ।
हरि जैसा चंद जप ॥१॥
मद्य मांस भक्षीति ।
हरि भोक्ता म्हणति ॥२॥
रांड पोर मेल्या वीर ।
रडतिल परोपरि ॥३॥
चिलो देऊनि भोक्ता ईश्वर ।
बोले श्री ळ सब्जधिर ॥४॥
खाता आनंदती आ टिरि ।
तरी भोगता श्रीहरि ॥५॥
ऐसे जाल्या हरि भक्ता म्हणा ।
सेख महमद दावि निजखुणा ॥६॥
