वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › 19. प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग

मोलाचे आयुष्य वेचूनि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073450 · अभंग क्र. ९

9.
मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय । पूर्वपुण्य होय लाभ याचा ॥१॥
अनंत जन्माचा शेवट पाहता । नरदेह हाता आला तुझ्या ॥२॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागी ॥३॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसी नारायण जोडी करा ॥४॥
करा हरिभक्ति परलोकी ये कामा । सोडविल यमा पासोनिया ॥५॥
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल । नका वेचू बोल नामेंविण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग