वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

अबदुलखानाची भोवली ता

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080965 · अभंग क्र. ९

9.
अबदुलखानाची भोवली ताहार । महापाषाण फोडिले खेचर ।
भक्त डळमळिल थोर । रामकृष्ण बाहारी । तुझी वासना तुजचि वरी ।
अभक्तासी कस्टि करी । भक्त रक्षुनी नानापरी गा ॥
भक्तीभाव जयाचा निर्धार । जिवे प्राणासी जे उदार । तेच उरती पैल पार गा ॥
सुध भाव जयाचा मनी । त्यासी मारिता नाही बा कोन्ही । बळकट आहे तयाचा घणी गा ॥
लोक म्हणती आब्दुलाखान । परि करिता नारायेण । कोण्ही न कळे तयाची खुण ॥
ऐसे बहुत भेडसाविती नेणो पळाले हे किती । परि लिहिले न चुके अंती गा ॥
असं भैतृत्व बहुत बोले जन । बोधल्याचे दृढ मन त्यांने उंची लाविले निशान गा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग