विठ्ठल श्रीहरी उभा भ
8.
विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरी । तिष्टती कामारी मुक्तिचारी ॥१॥
मुनिजना सुख निरंतर लक्ष । भक्ता निजसुख देत असे ॥२॥
पुंडलिक पुण्य मेदिनी कारुण्य । उध्दरिले जन अनंत कोटी ॥३॥
निरानिरंतर भीमारथी तीर । ब्रह्म हे साकार इटे नीट ॥४॥
नित्यता भजन जनी जनार्दन । ब्रह्मादिक खुण पावताती ॥५॥
निवृत्ति तत्पर हरिरुप सर्व । नाम घेता तृप्त आत्माराम ॥६॥
अर्थ:
ज्या पंढरीत श्री विठ्ठल उभे आहेत तिकडे चारी मुक्ति कामारी दासी होऊन तिष्टत आहेत. मुनिजन जेथे लक्ष केंद्रीत करुन जे सुख निरंतर भोगतात तेच सुख पंढरीत भक्तांना मिळते.पुंडलिकाने पुण्य पृथ्वीवर करुणा दावुन हे ब्रह्मस्वरुप पंढरीत भक्तजनांच्या उध्दारासाठी पंढरीत आणले.त्या पंढरीत निराभिवरे तीरावर हे परब्रह्म विटेवर उभे आहे.ब्रह्मादिकांनी खुण सांगितली आहे की हे ब्रह्म भजनामुळे जगत रुपात पाहता येते.निवृत्तिनाथ म्हणतात तत्परतेने नाम घेचल्यास तो आत्माराम तृप्त होतो.
