चैत्रपौर्णिमेस गेलो
9.
चैत्रपौर्णिमेस गेलो महादेवा ।
देव-यात्रा सर्वा पाहाविले ॥१॥
जाले समाधान देखोनी शंकर ।
मागे अभयकर भक्तियोगे ॥२॥
पंचरात्री तेथे क्रमोनिया जाण ।
सिंगणापूर स्थान तेथे आलो ॥३॥
कोरन्नीचे कण सहज मेळउ ।
तेणे सुखी जीउ होय माझा ॥४॥
अमृताचे परी वाटे गोड अन्न ।
पाप जळे जाण भक्षिलिया ॥५॥
बहेणि म्हणे माझे वय वर्ष नव ।
जाले आंतर्भाव सांगितला ॥६॥
