वारी वो वारी । देई क
9.
वारी वो वारी । देई का गा मल्हारी ।
त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥
वाहन तुझे घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी ।
वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी एसी पाहीन जेजुरी ॥२॥
ज्ञान कोटंबा घेऊनी आलो व्दारी । बोध भंडार लाविन परोपरी ।
एका जनार्दनी विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ॥३॥
