तुझिया सत्तेने वेदां
9.
तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे । सूर्यासी चालणे तुझिया बळे ॥१॥
ऐसा तू समर्थ ब्रम्हांडाचा धनी । वर्म जाणूनि शरण आलो ॥२॥
मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे । वायूने विचरावे सत्ते तुझे ॥३॥
नामा म्हणे काही न हाले साचार । प्रभू तू निर्धार पांडुरंग ॥४॥
