संत भेटती आजि मज । त
9.
संत भेटती आजि मज । तेणे मी झालो चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थूळी सहज । दोन्ही सूक्ष्मी वाढल्या ॥१॥
आलिंगने सुख वाटे । प्रेम चिदानंदी घोटे ।
हर्षे ब्रम्हांड उतटे । समूळ उठे मीपण ॥२॥
या संतासी भेटता । हरे संसाराची व्यथा ।
पुढता पुढती माथा । अखंडित ठेवीन ॥३॥
या संतांचे देणे । कल्पतरुहूनि दुणे ।
परिसा परीस अगाध देणे । चितामणी ठेंगणा ॥४॥
या संतांपरीस उदार । त्रिभुवनी नाही थोर ।
मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥
कृपाकटाक्षे न्याहाळिले । आपुले पदी बैसविले ।
बापरखुमादेविवरे विठ्ठले । भक्ता दिधले वरदान ॥६॥
