वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३१. निर्याणाचे अभंग

धन्य धन्य एकनाथा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088907 · अभंग क्र. ८

8.
धन्य धन्य एकनाथा ।
तुमचे पायी माझा माथा ॥१॥
दासोपंताचा अभिमान ।
गेला होताचि दरुशन ॥२॥
दत्तात्रय चोपदार ।
पुढे उभे कांठीकर ॥३॥
यवन अंगावरी थुंकला ।
प्रसाद देऊनि मुक्त केला ॥४॥
निळा शरण तुमच्या पाया ।
अनन्य भावे नाथराया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग