अलंकापुरी पुण्यठाव ।
8.
अलंकापुरी पुण्यठाव ।
तेथ समाधी ज्ञानदेव ।।१।।
पांडुरंगे दीधला वर ।
भेटी निर्धार कृष्णपक्षी ।।२।।
नित्य स्नानालागी जाणा ।
भागीरथी दिधली ज्ञाना ।।३।।
सरस्वती मणिकर्णिका ।
त्रिसंगमी वाहती देखा ।।४।।
येथे स्नान करिता ।
वास वैकुंठी तत्त्वता ।।५।।
ऐसे देव सांगता ।
कान्होपात्रा आनंदता ।।६।।
