पंढरीची वारी
८.
पंढरीची वारी
२९.
वाट धरिता पंढरीची । चिंता हारे संसाराची ॥१॥
ऐसे कोठे नसे पायी । धुंडिता ब्रह्मांड पाही ॥२॥
पाहिलीं शोधूनी । तीर्थे आणि देवस्थानी ॥३॥
मोक्ष मुक्ती पाही । सेना म्हणे लागा पायी ॥४॥
३०.
येथे सुखाचिये राशी । पार नाही त्या भाग्यासी ॥१॥
झालें आलिंगन । कांती निवाली दर्शने ॥२॥
उपकार उत्तीर्णता । सेना म्हणे नाही आतां ॥३॥
३१.
करिता योगयाग । न भेटेची पांडुरंग ॥१॥
एका भावावांचोनि कांहीं । देव जोडे ऐसा नाही ॥२॥
धूम्रपानादि साधन । करिता व्यर्थ होय शीण ॥३॥
करिता साधने शिणलीं । सेना म्हणे वाया गेलीं ॥४॥
