उत्तम हा चैत्रमास ।
9.
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमी ॥२॥
मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनी । माझे वंशी चक्रपाणि ॥४॥
सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥
नाही कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥
अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥
नामा म्हणे डोळा । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥
