वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

पांडुरंगकांती दिव्य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073636 · अभंग क्र. ९

9.
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य जःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हे तंव कैसेंनि गमे ।
परेहि परते बोलणे खुंटले । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥
पाया पडू गेले तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
समोर की पाठिमोरा न कळे । ठकचि पडिले कैसे ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊ गेले तंव मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहो गेले तंव । भीतरी पालटु झाला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग