किर्तन विक्षेप (व्यस
९.किर्तन विक्षेप (व्यसन) करणारचा निषेध
३२.
बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित ॥१॥
दुष्ट अधम तो खरा । येथुनियां दूर करा ॥२॥
तमाखु ओढूनि सोडी धूर । दुष्टबुद्धि दुराचार ॥३॥
पान खाय कीर्तनांत । रुधिर विटाळशीचें पीत ॥४॥
त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥५॥
