वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

आदि आत्मा जोतिलिंगा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073671 · अभंग क्र. ८

8.
आदि आत्मा जोतिलिंगा लांबियेला घटु । स्थाविरिले मायावस्त्र ।
लिंगावरी प्रविष्ट ॥तपन नाम ध्वनी । इंद्रिया केले सपाटु ॥१॥
हळुहळु गळती गळे । गळो लागली सकळे ॥उच्चारिता कृष्णनाम ।
भेणे पळिजे कळिकाळे ॥त्रिगुण सुटल्या गांठी घटु विराला सघन ।
पंचतत्त्वे एके ठाई आत्मा नांदे परिपूर्ण ॥जिवशिव हारपले एक दिसे चैतन्य ।
आत्माराम विदेहिया ॥श्रीगुरुने सांगीतली खुण ॥२॥
नरदेह अवचिते । जो साधकु होय नारायण ।
परमानंदे गळति गळे । पांचहि तत्त्वे हरपोन ॥३॥
निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु ।
आळंकापुरी स्थापियेले ॥दिधला विठ्ठल उच्चारु ।
समाधि जीवन माझे वरी अजानवृक्षतरु ॥
जोंवरी चंद्रसूर्य तोवरी कीर्तिघट स्थिरु ॥४॥
गाति वाति साधु मुनी छंद घट मठी चित्त ।
विरेल देह बुध्दि ज्ञानदाता देईल उचित ॥
विज्ञानेंसी गोष्टी सांगे ऐसे पद पावत ।
बापरखुमादेविवरी लांबविला घटु ज्ञानदेव सांगत ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग