वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 19. संत भानुदास › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94 › 2. श्रीविठ्ठलमाहात्म्य

संत भानुदास अभंग श्र

🙏 19. संत भानुदास · ABH-074183 · अभंग क्र. ८

८.
संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य

अनादि परब्रह्मा जें का निजधाम ।
ते ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥
जे दुर्लभ तिहिं लोका न कळे ब्रह्मादिका ।
तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥
जयाते पहातं श्रुती परतल्या नेति नेति ।
ती हे परब्रह्मा मूर्तिं विटेवरी ॥३॥
वेदं मौन्य पड़े श्रुतीसी सांकड़े ।
वर्णिता कुवाड़ें पुरणांसी ॥४॥
ज्ञानियांचें ज्ञान मुनीजनांचे ध्यान ।
ते परब्रह्मा निधान विटेवरी ॥५॥
पुंडलिकाचे तपें जोडलासे ठेवा ।
भानुदास देवा सेवा मागे ॥६॥

९.

अद्वय आनंद तो हा परमानंद ।
शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥
सांवळे रूपडें गुणा आगोचर ।
उभा कटी ठेऊनी विटे ॥२॥
पीतांबर परिधान चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥३॥
भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर ।
नेणवे विचार ब्रह्मादिका ॥४॥

१०.

वेदीं संगितलें श्रुतिं अनुवादिलें ।
तें ब्रह्मा कोंदलें पढंरीये ॥१॥
वाळंवंटीं बुंथी श्रीविठठ्लनामे ।
सनकादिक प्रेमे गाती जया ॥२॥
भानुदास म्हणे तो हरि देखिला ।
हृदयी सांठविला आनंदभरित ॥३॥

११.
चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी ।
विठ्ठल राज्य करी पंढरीये ॥१॥
ऋद्धिसिद्धि धृति वोळंगती परिवार ।
न साहती अवसर बह्मादिकां ॥२॥
सांडोनि तितुलें यथाबीजें केलें ।
कवणें चाळविले कानडीयासी ॥३॥
उष्णोदक मार्जन सुगंधचर्चन ।
भीवरा चंदन पाट वाहे ॥४॥
रंभा तिलोत्तमा ऊर्वशी मेनिका ।
कामारी आणिका येती सर्वे ॥५॥
कनकाचे परयेंळी रत्नाचे दीपक ।
सुंदर श्रीमुख ओवाळिती ॥६॥
संत भागवत सकळ पारुषले ।
निःशब्द होऊनि ठेले तुजविण ॥७॥
रुक्माबाई ती जाहलीसे उदार ।
पुंडलीअका कैसे पंडिले मौन ॥८॥
येसी तरी येई पंढरीच्या राया ।
अगा कृपावर्या पांडुरंगा ॥९॥
धन्य पंढरपूर विश्रांती माहेर ।
धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥
भानुदास म्हणे चला आम्हांसवें ।
वाचा ऋन देव आठवावे ॥११॥

१२.
जैसा उपनिषदंचा गाभा । तैसा विटेवरी उभा ।
अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥१॥
उगवती या सुरज्या । नवरत्‍ने बांधू पूजा ।
मुगुटीं भाव पै दुजा । उपमा नाही ॥२॥
दोन्हीं कर कटी । पीतांबर माळ गांठी ।
माळ वैजयंती कंठी । कौस्तुंभ झळके ॥३॥
कल्पदुम छत्राकार । तळी त्रिभंगीं बिढार ।
मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥४॥
वेणुचेनि गोडपणे । पवन पांगुळला तेणें ।
तोही निवे एक गुणें । अमृतधारीं ॥५॥
अहो लेणियाचे लेणें । नादसुखासी पै उणें ।
विश्व बोधिले येणे । गोपाळवेषें ॥६॥
पुंडलिकाचेनि भावे । श्रीविठ्ठला येणे नावें ।
भानुदास म्हणे दैवे । जोडले आम्हा ॥७॥

१३.

शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु ।
चरणी ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥१॥
बरवा बरवा केशिराजु । गरुडवहन चतुर्भूजु ।
कंठी कौस्तुभ झळके बिजु । मेघःशाम देखोनी ॥२॥
करी सृष्टिची रचना । नाभी जन्म चतुरानाना ।
जग हें वाखाणी मदना । तें लेंकरुं तयाचे ॥३॥
कमळा विलासली पायी । आर्त तुळशीचे ठायी ।
ब्रह्मादिका अवसरु नाही । तो यशोदे वोसंगा ॥४॥
उपमा द्यावी कवणे अंगा । चरणी जन्मली पै गंगा ।
सोळा सहस्त्र संभोगा । नित्य न पुरती कामिनी ॥५॥
आधिष्ठान गोदातीरीं । श्रुद्धिसिद्धि तिष्ठती द्वारी ।
भानुदास पूजा करी । वाक् पुष्पे अनुपम्य ॥६॥

१४.

लावण्य रुपड़े पहा डोळेभरी ।
मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा आई ।
गरुड हनुमंत ठायी उभे असती ॥२॥
चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी ।
दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥
वेणुनादीं काला गोपाळ करिती ।
भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥

१५.
देखितांचि रूप विटेवरी गोजिरें ।
पाहतां साजिरे चरणकमळ ॥१॥
पाहतां पाहतां दृष्टी धाये जेणे ।
वैकुंठीचें पेणें सहज हाती ॥२॥
भानुदास म्हणे लावण्य पुतळा ।
देखियेल डोळा पांडुरंग ॥३॥

१६.
चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े ।
पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडले ।
भुषण मिरवलें मकराकार ॥२॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा ।
कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हाती पद्म ते शोभले ।
भानुदासे वंदिलें चरणकमळ ॥४॥

१७.

गोंड साजिरे रूपस । उभा आहे हृषिकेश ।
योगी ध्याती जयास । तो हा सर्वेश साजिरा ॥१॥
रूप मंडीत सगुण । शंख चक्र पद्म जाण ।
गळा वैजयंती भूषण । पीतांबर मेखळा ॥२॥
कस्तुरी चंदनाचा टिळा । मस्तकी मुकुट रेखिला ।
घवघवीत वनसावळा । नंदरायाचा नंदनु ॥३॥
हरूषे भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे ।
प्रेम विठोबाचें । अंगी वसे सर्वदा ॥४॥

१८.

उन्मनी समाधीं नाठवे मनासी ।
पहाता विठोबासी सुख बहु ॥१॥
आनंदाआनंद अवघा परमानंद ।
आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे ।
पाहतां साठवे रूप मनी ॥३॥
नित्यता दिवाळी नित्यता दसरा ।
पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥
भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान ।
विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥

१९.

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें ।
म्हणोनि विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी जाहलों त्यांचा दास ।
माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥
आणिका दैवता नेघे माझे चित्त ।
गोड गाता गीत विठोबाचें ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझें ॥४॥
भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे ।
सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥

२०.
आलो दृढ धरुनी जीवी ।
तो गोसावी भेटला ॥१॥
जन्ममरण हरला पांग ।
तुटला लाग प्रपंच ॥२॥
इच्छा केली ती पावलों ।
धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥
भानुदास म्हणे देवा ।
घ्यावी सेवा जन्मोजन्मी ॥४॥

२१.

वेदशास्त्राचे सार ।
तो हा विठ्ठल विटेवर ॥१॥
पुढें शोभे चंद्रभागा ।
स्नाने उद्धार या जगा ॥२॥
पद्मतळे गोपाळपुर ।
भक्त आणि हरिहर ॥३॥
भानुदास जोडोनी हात । उभा समोर तिष्ठत ॥४॥

संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग