(घोंगडीची रूपके)
8.
(घोंगडीची रूपके)
मुळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावे त्याचे देणेंचि नाही । येचि वाहि देखतसो ॥धृपद॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुंगिला फासा येथुनिया ॥३॥
अर्थ :
हे गोपाळा तुम्हाला हा मूळचाच छंद लागलेला आहे तो काही केल्या तुम्ही सोडत नाहीत. की ज्याचे काही घेतले तर त्याला परत तुम्ही ते देतच नाहीत एखादयाचे काही घेतले की परत तुम्ही त्याला माघारी देत नाहीत हे मी तुमचे वागणे मी खूप दिवसापासून पाहात आहे. देवा माझी तर घोंगडी किती मोठी आहे ती तू घेतोस परंतू तुझ्या ढुंगणाची लंगोटी देखील तू सोडत नाहीस म्हणजे दर्शन तर सोड तुझा साधा अनुभवही आम्हाला येऊ देत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, की मी आता माझ्या देहरुपी घोंगडीचा फासा हुंगून टाकला आहे म्हणजे माझ्या देहाचाच त्याग केला आहे.
