आमुचे सुख दुःख कोण द
8.
आमुचे सुख दुःख कोण दुजा वारी । तुम्हीच श्रीहरि मायबाप ॥१॥
तुमच्या उच्छिष्टाची धरोनिया आस । बैसले रात्रं-दिवस धरणे करी ॥२॥
परी तुम्हा नये आमुची करूणा । केधवा येईल मना तुमचिया ॥३॥
काम क्रोध लोभ मदमत्सर वैरी । हे झडकरी वारी मायबापा ॥४॥
म्हणोनी धरिले तुमचे पदरा । म्हणतसे सोयरा चोखियाची ॥५॥
