वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मागोनी भिक्षेसी क्रम

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076446 · अभंग क्र. ८

8.
मागोनी भिक्षेसी क्रमितसे’ वाट ।
सोसुनिया कष्ट नानापरी ॥१॥
मायबाप बंधू भ्रतारेसी जाण ।
महादेववन पाहावया ॥२॥
नरसिंहदर्शन घेउनी संपूर्ण ।
पांडुरंगस्थान देखियेले ॥३॥
भीमाचंद्र भागा पुंडलीक भक्त ।
वेणुनादी मुक्त प्राणिमात्रे ॥४॥
पद्मालयी स्नान देवाचे दर्शन ।
नामासंकीर्तन आइकिले ॥५॥
राही रखुमाई सत्यभामा सर्व ।
देखियेले पूर्वद्वारयुक्त ॥६॥
महाद्वारातूनी करित प्रवेश ।
वातले मनास महासौख्य ॥७॥
पांडुरंग-मूर्ति देखोनी पवित्र ।
संतोषले नेत्र इंद्रियेसी ॥८॥
केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त ।
चित्त हे विरक्त करूनिया ॥९॥
वाटे मनामाजी राहावे येथेची ।
परी प्राक्तनाची दशा नाही ॥१०॥
जीव जावो परी पंढरीचे स्थळ ।
न संडावे जळ ऐसे वाटे ॥११॥
बहेणि म्हणे पंचरात्री पंढरीस ।
केला आम्ही वास पुण्ययोगे ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग