वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

तुळशी वृंदावनी उभा त

🙏 24. संत बंका · ABH-075635 · अभंग क्र. ९

9.
तुळशी वृंदावनी उभा तो ब्राह्मण । पुसे घरी कोण आहे बाई ॥१॥
कोणाचे हे घर दिसते साजिरे । मुले आणि लेकुरे काय आहे ॥२॥
ऐकोनि उत्तर चोखयाची कांता । प्रेमजल नेत्रा भरियेले ॥३॥
म्हणे घरधण्यासी विठोबाचा छंद । आठविती गोविंद रात्र दिवस ॥४॥
संसारी सुख नाही अणुमात्र । सदा अहोरात्र हाय हाय ॥५॥
पोटी ही संतान न देखेची कांहीवांया जन्म पाही झाला माझा ॥६॥
बंका म्हणे ऐसी बोलोनीया मात । घाली दंडवत ब्राह्मणासी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग