वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

विमानांची दाटी अंतरि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073284 · अभंग क्र. ९

9.
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
सहाजणी भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥
आठराजणे तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीत श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघा जणा तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठी ॥५॥
आठ्यांशी सहस्त्र वर्णिताती तुज । ब्रम्हाडांचे बीज तुज नमो ॥६॥
जन्म मरणाने नाही तया भय । आठविती पाय तुझेजे का ॥७॥
नवजणी तुझ्या पायी लोळतांती । परब्रम्हा मूर्ति तुज नमो ॥८॥
नामाम्हणे ऐसी करिताती स्तुती । पुष्पे वाहूनि जाती स्वस्थळासी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग