वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

तुरे कांबळा डांगेवरी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074995 · अभंग क्र. ९

9.
तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करि ।
वैजंयती रूळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥
गोविंदु वो पैल गोपाळु माये ।
सुरतरू तळवटी देखे कैसा उभा राहे ॥
आडत्रिपुंड्र शोभते द्रुमिळ भारेंसि जे जात ।
नागर केशरीची पुष्पे कैसी पै मिरवत ॥२॥
हिरिया ऐशा दंतपक्ति अधर पोंवळ वेली ।
श्रवणी कुंडले ब्रह्मरसाची वोतली ॥३॥
विश्वाचे जीवन ते म्या सार देखियेले ।
योगी ध्याती ध्यानी ब्रह्मतेंचि गोकुळांसी आले ॥४॥
आजि धन्य धन्य जावे राया कृष्णासी देखिले ।
निवृत्तिमुनिराय प्रसादे ध्यान हृदयासी आले ॥५॥

अर्थ :
डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणु व वक्षःस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे. तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर तिनरेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्णरुप उभे आहे. त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत. जे विश्वाचे जीवन आहे ते रुप मी साररुपाने पाहिले ज्या रुपाला योगी ध्यातात तेच रुप गोकुळात अवतरले आहे. आज मी धन्य झालो निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ते रुप पहिले माझ्या ध्यान्यात व नंतर हृदयत स्थापित झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग