आंनदले वैष्णव गर्जती
8.
आंनदले वैष्णव गर्जती नामे । चौदाही भुवने भरली परब्रम्हे ॥१॥
नरहरि नरहरि नारायणा । सनकसनंदन मुनिजनवंदना ॥२॥
गाता वाता वाचता प्रेमे उल्हासे । चराचरींचे दोष नाशियले अनायासे ॥३॥
हरि मनी हरि चित्ती हरि अंकु शरीरी । तयाते देखोनि हरि चार्ही बाह्या पसरी ॥४॥
अंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता । प्राकृतवाणी केवि वानु हरिंभक्ता ॥५॥
तीर्थे पावन जिही धर्म केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगती ॥६॥
मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसी पाहाले ॥७॥
बापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु । तया संतचरणी स्थिर हो का मनु ॥८॥
