ऐकावे हे विठ्ठल घुरे
8.
ऐकावे हे विठ्ठल घुरे ।
विनंती माझी ही सत्वरें ॥१॥
करी संसाराची बोहरी ।
इतुके मागतों श्रीहरी ॥२॥
कष्ट करिता जन्म गेला ।
तुझा विसर पडला ॥३॥
माळी सांवता मागे संतान ।
देवा करी गा नि:संतान ॥४॥
8.
ऐकावे हे विठ्ठल घुरे ।
विनंती माझी ही सत्वरें ॥१॥
करी संसाराची बोहरी ।
इतुके मागतों श्रीहरी ॥२॥
कष्ट करिता जन्म गेला ।
तुझा विसर पडला ॥३॥
माळी सांवता मागे संतान ।
देवा करी गा नि:संतान ॥४॥