पंढरीच्या सुखा अंतपा
8.
पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा । शेषा सहस्त्रमुखा न वर्णवेचि ॥१॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोजन्मी वारी घडली तया ॥२॥
पंढरीस जाता प्रेम उचंबळत । आनंदे गर्जत नामघोष ॥३॥
विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे । विसरला दुःखे देहभाव ॥४॥
नामा म्हणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥
