कृपेच्या सागरा परिसा
8.
कृपेच्या सागरा परिसा विनवणी । मस्तक चरणी असो माझा ॥१॥
बहुत प्रकार मज ते कळेना । घातली चरणा मिठी बळे ॥२॥
देह मन चित्त करी तळमळ । न चालेचि बळ काय करू ॥३॥
न सुटे संसार पडतसे मिठी । तेणे पडे तुटी तुम्हा सर्वे ॥४॥
निर्मळा म्हणे काय करू आता । तुम्ही तो परते मोकलिले ॥५॥
