संत निळोबाराय गाथा (
8.
संत निळोबाराय गाथा (बालक्रीडा)
गडिया म्हणे पळता घरे।
नवनिते क्षीरे असती ते ॥१॥
म्हणती गोवळ ऐके कान्हा।
आहेसि तू देखणा पुढे होई ॥२॥
आम्ही नेणो थारेमारे।
अवघी घरे तुज ठावी ॥३॥
निळा म्हणे काढी माग।
आम्ही सवेग येऊ मागे ॥४॥
