उदारा पंढरीराया नको
9.
उदारा पंढरीराया नको अंत पाहू । कोठ वरि मी पाहू वाट तुझी ॥१॥
माय तू माउली जीवींचा जिव्हाळा । पुरवावा लळा माय बाप ॥२॥
सर्वांपरी उणे दिसते कठीण । आता नका शीण मानू माझा ॥३॥
निवांतचि ठेवा तुमचिये दारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
