वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

ऐसियांचे चरित्र जो आ

🙏 4. संत नामदेव · ABH-081661 · अभंग क्र. १०३६

1036.
ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके| तो या भक्ताबरोबरी तुके|भोगी वैकुंठीची निजसुखें| बोलिले मुखे श्रीविठ्ठल॥१॥
धन्य धन्य ते भक्त| ज्या कारणे श्री भगवंत| ऐसे पवाडे करित| विश्व उद्धरी तेणे करूनि॥२॥
जे भाग्याचे होति| त्यासिच हे होय प्राप्ती|ते मागुते न येति पुनरावृत्ती| गर्भवासा॥३॥
नामा म्हणे नामस्मरण| तुटति प्रप़ंचधरण बंधन|सुख पावती निदान| समचरण देखलिया॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग