वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

असे येथीचिया दिने ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079169 · अभंग क्र. १०१७

1017.
असे येथीचिया दिने । भाग्यहीन सकळा ॥१॥
भांडवल एवढे गाठी । नाम कंठी धरियेले ॥धृपद॥
आणिक ते दुजे काही । मज नाही यावरी ॥२॥
तुका म्हणे केला कोणे । एवढा नेणे लौकिक ॥३॥

अर्थ :
या परमार्थ विषयांमध्ये मी सर्वापेक्षा हीन आहे. माझ्याकडे माझे मुख्य भांडवल म्हणजे मी कंठामध्ये या हरीचे नाम धारण केलेले आहे. यापेक्षा दुसरे माझ्याजवळ काहीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे फक्त हरिनामाचेच भांडवल आहे तरीही माझा एवढा लौकिक कसा झाला हे मला काही कळत नाही ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग