ऐसी स्तुती नमनाची|के
1020.
ऐसी स्तुती नमनाची|केलिया भगवंताची|ऐकता जाली रुची|म्हणे धन्य धन्य राजकीय सख्या॥१॥
कैसी स्तुती परिकर|जपता नामावळी साचार|वेगी तुष्टले हरिहर निज ब्रह्म स्वरूप॥२॥
वैष्णव सभोंवते उभे|तिही जयजयकार प्रतिभे|करूनि रुक्मिणीवल्लभे|तया प्रसाद दिधला॥३॥
मागुता ज्ञानदेव वदे|धन्य धन्य तुझी चरणारविंदें|तेथे रातलिया योगिवृंदें| ते चरण धन्य धन्य॥४॥
पुंडलिके स्तवन|मांडावे तंव नारायण|म्हणे सन्मुख उभा सोपान|यासी समाधि देणे लागेल॥५॥
निवृत्ती मुक्ताई दोघें|ती बुझाविली पांडुरंगें|उद्धव अक्रूर वेगे| तया संगे निरवलीं॥६॥
