वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

अष्टोत्तरशे तीर्थे स

🙏 4. संत नामदेव · ABH-081751 · अभंग क्र. १०३९

1039.
अष्टोत्तरशे तीर्थे सारी | ओघे आली आळंकापुरी |वाद्ये वाजताती गजरी | कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु | अनुभवी न म्हणतीच बद्धु |तसा औटपिठाचा नादु | आठवी गोविंदु आवडीने ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि | सत्रावी कळा माय रुक्मिणी |जाणत असे अंत:करणी | भक्त इच्छा ॥३॥
भावे विठ्ठले केली गोष्टी | ज्ञानदेवे अपूर्व इच्छिले पोटी |जावे उठाउठी | समुदायेंसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग