मनासी स्थिरता नामे द
1027.
मनासी स्थिरता नामे दत्त वेध । दुजा नाही छंद आणीक कांही ॥१॥
म्हणोनि संकल्प दृढ झाला पायी । दत्तावाचुनी ठायी नोहे कांही ॥२॥
पाहता पाहणें परतले मन । पाहण्याचें विंदान विसरले ॥३॥
एका जनार्दनी परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळा आत्मदृष्टी ॥४॥
