वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

ऐसा निवृत्ती स्थिराव

🙏 4. संत नामदेव · ABH-081671 · अभंग क्र. १०२८

1028.
ऐसा निवृत्ती स्थिरावला|महाविष्णु संतोषला|मग सोपानदेवे आरंभिला| स्तुतिवाद परियेसा॥१॥
जयजया तू रामकृष्णा| भक्तभाविका हरी तृष्णा|देही दीपक सहिष्णा| रामकृष्ण म्हणतांचि॥२॥
नरहरी नरकेसरी| टाळी वाउनिया गजरीं|टाळ मृदंग झणत्कारी| जयजय कृष्ण म्हणो आम्हीं॥३|एक हरिविण नाही सखा| त्रिभुवनी आत्मा देखा|समाधिसुखविशेखा| चरणरजे डौरवावें॥४॥
धन्य हे भूमिका देश| आपण हरि जगन्निवास|ज्ञानदेवी केला वास| समाधिसुख घेउनी॥५॥
निवृती ऐसा श्रेष्ठ गुरू| तोहि समाधीसी होय स्थिरू|तरि पुढे काय करणे विचारू | तो सांगावा स्वामिया॥६॥
देव म्हणे ब्रह्मावतारा| या अवघिया चराचरा|श्रेष्ठ तूंचि निर्धारा| मनुष्यरूपे अवतरलासी॥७॥
सकळ हे तुझे व्यापक| चराचर हे त्रैलोक्य|अधर्म जालिया चाळक| अवतार घेती तिघे॥८॥
ऐसे बोले पांडुरंग| सोपान निवाला सर्वांग|म्हणे सांकडे फेडिता श्रीरंग| तूंचि श्री विठ्ठला॥९॥
नामा म्हणे सोपानदेवें| मागुती स्तुति आदरिली भावें|जेणे करूनिया बरवें| समाधिसेजेची॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग