वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसे आळंकापुर पीठींचे

🙏 4. संत नामदेव · ABH-081702 · अभंग क्र. १०१८

1018.
ऐसे आळंकापुर पीठींचे | भक्त नांदती दैवाचे | जे का सागर भाग्याचे | ज्ञानउदयो प्रकासिते ॥१॥
मग षोडश उपचारी | पूजा ज्ञानदेव आदरी | दिव्यवाद्ये मंगळतुरी | ओवाळिती पंचारतिया ॥२॥
ज्ञान सोपान निवृत्ती | मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती | ओंवाळिती विष्णूमूर्ती | चतुर्भुज पै ॥३॥
पीतांबरधारी श्याममूर्ति | शंखचक्राची आकृती | उद्धव अक्रूर ढाळिती | चवरे वरी ॥४॥
प्रत्यक्ष लक्ष्मी आपण | दिव्य स्वरूप प्रसन्न वदन |माजी मिरवे दिव्य सिंहासन | त्यावरी आरुढली ॥५॥
पुढे गरूड जोडल्या करी | उभा पक्षांचा फडत्कारी | सूर्य लोपे तेजाकारी | अमृतकरू नाम एक ॥६॥
गोपाळ देव्हडे उभे |मंजुळ पावे वेणुप्रभे |शुभकाळ सुप्रभे | माजी स्तुति मांडिली ज्ञानदेवे ॥७॥
नामा म्हणे ऐका | पुढे ग्रंथाची पीठिका | तो तारील सकळ लोका | एक एक अक्षर आईकता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग