वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

तंव पुंडलिक पुढारला|

🙏 4. संत नामदेव · ABH-081658 · अभंग क्र. १०३०

1030.
तंव पुंडलिक पुढारला| कर जोडोनि वदला|म्हणे वेदादिका अबोला| तुझिया रूपाचा॥१॥
तो तू प्रकट श्रीरंगा| भीमातटी पांडुरंगा|येउनि आमुचिया लोभा भक्तजना तारिसी॥२॥
नेणो कोण भक्तपण| नेणो तुमचे महिमान|कोण तप कोण साधन| कोणे जन्मी केले होतें॥३॥
नीरे भिवरेचा संगमीं| चंद्रभागेचा उगमीं|वेणुनाद परब्रह्मीं| गोपाळ गजरे गर्जती॥४॥
तरी स्वामी दयाळा| महाविष्णू गोपाळा|भक्तालागी कृपाळा| तारावया दासासी॥५॥
माझे करूनिया मिस| राहिलास युगी अठ्ठावीस|धररूनि सगुण गुणास| माझे भक्ति लोधलासी॥६॥
तू नियंता ईश्वरमूर्ति| सकळ गोसावी श्रीपती|तुजवांचोनी नेणे मती| दयामूर्ति परब्रह्मा॥७॥
नामा म्हणे पुंडलिका| देवे म्हणती पुण्यश्लोका|स्तुति आदर केला निका| धैर्य विवेक. तूंचि होसी॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग