नाही संदेह करी हा पा
1038.
नाही संदेह करी हा पाठ ।
पावसी वैकुंठ हरि म्हणता ॥१॥
जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु ।
करिता नामोच्चारु वरिष्ठ पदी ॥२॥
नेदी हा आघात लागो वारा ।
धावेल सामोरा स्वामी माझा ॥३॥
निळा म्हणे घेईल वोसंगा ।
नेईल जेथे जगा गम्य नाही ॥४॥
