वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

चतुर्भुज श्याममूर्ति

🙏 4. संत नामदेव · ABH-081730 · अभंग क्र. १०१७

1017.
चतुर्भुज श्याममूर्ति | शंखचक्राची आकृती | पीतांबराची दिव्य दीप्ति | पडिली स्रृष्टीवरी ॥१॥
धन्य धन्य ज्ञानदेव |धन्य धन्य तो माधव |मग आरंभिला अनुभव | ज्ञानदेवाचेनि मुखे ॥२॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा | तू अवतरोनि माजि चराचरा | हरिला महादोषथारा | तुझेनि कवित्वे ॥३॥
तुझे कवित्व माझ्या गोष्टी | जो परिसेल हे सृष्टी |तो येईल माझे भेटी | वैकुंठा पीठी विष्णूच्या ॥४॥
तुवा जो ग्रंथानुभव | गीते सांगितला भाव | ते मुख्य ठेवणे राणीव |अनुभवीच जाणती ॥५॥
तैसाची अमृतानुभव | सिध्द पीठ केले भाव | दाउनी मनोहर राणीव | निज गुह्य आमुचे ॥६॥
वसिष्ठगीतेची टीका | भावार्थ काढिला श्लोका | ग्रंथ संचिला नेटका | करूनि रचना दाविली ॥७॥
तू महाब्रह्मींचा अंश | पदपदांतरी केला प्रवेश | दाऊनिया उदास विशेष | या जीवांसी तारिले ॥८॥
तरी तू आता एक वेळ | माझी स्तुती करी निर्मळ | जेणे करूनि तरती सकळ | वक्ते श्रोते ग्रंथकार ॥९॥
नामा म्हणे परमानंद | पावोनिया उद्बोध |केला ज्ञानदेव सावध |स्तुती उपरती मांडिली ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग