ऐसे तीर्थ सर्वोत्तम|
1025.
ऐसे तीर्थ सर्वोत्तम|सांगतसे पुरुषोत्तम|शंकरादि परमधाम|ब्रह्मनाम वर्णित॥१॥
क्षेत्रमहिमा अति अद्भुत |आदि सिध्देश्वर कुळदैवत|समर्थ महाभागवत| नामे गर्जत सर्वकाळ॥२॥
म्हणे पुंडलिक पूर्वीचे स्थळ| आणि शिवाचे मूळपीठ निर्मळ|तेथे निर्विकल्प सोज्वळ| तप विशाळ जोडिले॥३॥
क्षेत्र पंढरीहुनी अधिक| ऐसे बोलती ब्रह्मादिक|म्हणती धन्य येथिंचे लोक| शुद्ध भाविक प्रेमळ॥४॥
घडे महाविष्णूचे पूजन| तीर्थ व्रत संध्यास्नान|वाचे हरिनाम कीर्तन| श्रवणी गुण विष्णूचे॥५॥
विठोजी म्हणे ऐक भक्ता| तपोनिधी महंत तू सर्वथा|ज्ञानदेवासारिखा वक्ता| मज आवडता न दिसे॥६॥
तुम्ही दोघे असा या सृष्टीं| जग उद्धारी पाटोवाटीं|कीर्तन करिता उठाउठी| तो वैकुंठी पावावे॥७॥
पुंडलिके नमस्कारिले हरी| चरणरज वंदिले शिरी|म्हणे मी भाग्याचा उजरी| तू केवारी आमुचा॥८॥
नामा म्हणे देवभक्त| एक हैऊनि समस्त|निवृत्तिराज स्तुति बोलत| प्रेम अद्भुत दाटलें॥९॥
