वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

मंगळमूर्ति सुखधामा |

🙏 4. संत नामदेव · ABH-081746 · अभंग क्र. १०३७

1037.
मंगळमूर्ति सुखधामा | भक्तांचिया कल्पद्रुमा|निवृत्तीचिया पुरुषोत्तमा | नमो तुज ॥१॥
विद्या सागरा वैरागरा | संकटी माउली ज्ञानेश्वरा |भरित दाटले अंबरा | तो तू योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ | संत श्रोतिया केला सुकाळ |दिधले पुरुषार्थाचे बळ | ते तू केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंद लहरी | ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी |संस्कृत प्राकृत वैखरी | वदविली माझी ॥४॥
आता मोक्षाचिया वाटा | पाहिला षड्चक्र चोहटा |आज्ञा द्यावी वैकुंठा | ज्ञानदेव म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग