स्वानंदे आवडी दत्त प
1026.
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळा । तंव चराचर अवघे श्रीदत्तची लीला ॥१॥
विस्मयो दाटला आता पाहुं मी कैसे । देखता देखणे अवघे दत्तचि दिसे ॥२॥
असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥
एका जनार्दनी तेथे अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥
