वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

तंव अंतरिक्षी गगनी|

🙏 4. संत नामदेव · ABH-081663 · अभंग क्र. १०२२

1022.
तंव अंतरिक्षी गगनी| देव बैसोनि विमानी|वर्षताती दिव्य सुमनीं| पांडुरंगावरी॥१॥
विठोबा गुणनिधी| सवे पुंडलिक सुबुद्धि|लघिमा आणिमादी सिद्धी| सवे असती॥२॥
मग नेमिलिया तिथी| कृष्णपक्ष अष्टमी समयी|नाम संकीर्तन संतसंगतीं| तो ब्रह्मप्राप्ति पावला॥३॥
नवमी गजर कथेचा| तरि वैष्णव तोचि साचा|चतुर्भुज होईल हे वाचा| वदोनिया गेले॥४॥
सहज ते दशमी | दिंडी जागरण आश्रमी|तो येईल वैकुंठ ग्रामीं| कीर्तन करीतची॥५॥
एकादशी श्रेष्ठ गाढी| नामस्मरणे कोटीयाग जोडी|येकी घडी युगाएवढी| एवढे सामर्थ्य इयेचें॥६॥
एकादशी दिननिशीं| जागरणी ह्रषिकेशी|कीर्तन करील अहर्निशीं| तरी तो तारील सर्व जनां॥७॥
द्वादशीस क्षीराब्दी| कीर्तन करील आल्हादीं|तो पावन होईल गोविंदीं| निजपदी विष्णूचा॥८॥
त्रयोदशी उत्तम थोर| करिल दिंडी पताका गजर|टाळ मृदंगे झणत्कार| तरि तो सकळ कुळ तारील॥९॥
नामा म्हणे चतुर्दशीं| अमावस्येच्या दिवशीं|ज्ञानदेवी राहेल नेमेंसी| तरी तो तैरेल भूतकाळीं॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग