वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

श्रीगुरुकृपे दत्त वो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087911 · अभंग क्र. १०२५

1025.
श्रीगुरुकृपे दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्‍यावरी बैसविला । अभेद पुर्ण चांदवा तेथे दिला । शुद्ध भक्तीनें दत्त पुजियेला ॥१॥
दत्तचरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ.॥
सोहं गुढी तेथे उभारिली । मंत्र उपदेशें देहबुद्धी गेली । पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जालीं ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी । जनी वनी एकात्मता खाणी । एका जनार्दनी रंगलीसे वाणी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग