न कळेचि प्रेम याची ग
1024.
न कळेचि प्रेम याची गोडी ।
धावे तांतडी नाम घेता ॥१॥
भरोनिया मन अंतरी राहे
परताचि नोहे जवळुनी ॥२॥
न बिसंबे त्या रानी वनी ।
साउली धरुनी चाले सवे ॥३॥
निळा म्हणे पुरवी भुके ।
वागवी भातुके खांदयावरी ॥४॥
1024.
न कळेचि प्रेम याची गोडी ।
धावे तांतडी नाम घेता ॥१॥
भरोनिया मन अंतरी राहे
परताचि नोहे जवळुनी ॥२॥
न बिसंबे त्या रानी वनी ।
साउली धरुनी चाले सवे ॥३॥
निळा म्हणे पुरवी भुके ।
वागवी भातुके खांदयावरी ॥४॥