वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

म्हणे विठोजी शंकराचा

🙏 4. संत नामदेव · ABH-081668 · अभंग क्र. १०२७

1027.
म्हणे विठोजी शंकराचा| प्रत्यक्ष अवतार तुझा साचा|स्तुति केली असे वाचा| विचार स्मयाचा पूर मज॥१॥
वसति सप्तद्वीप नवखंड| त्यामाजी अनंत ब्रह्मांड|रोमरंध्री ज्या अखंड| तो मनुष्यरूपे मेदिनी॥२॥
निवृत्तिनाथ नाना अवतारीं| तुमच्या सेवेसी श्रीहरी|जे जे प्रेरसी कामारी| सांगितले करी उगाचि॥३॥
म्हणे देवाधिदेवा आता| सांगाल ते करू तत्वता|हरू भव र्णवाची चिंता| या त्रैलोक्याची॥४॥
तंव निवृत्तीने लोटांगण| म्हणे नाही तुज समान|आम्हांकारणे नारायण| साहाकारी होसी॥५॥
आमुचा तपे समर्थें| तुवा सिद्धी पावविली जगन्नाथें|सरते करूनिया आम्हांते| विष्णुमार्गे लाविलें॥६॥
देव म्हणे तू आधीं| विष्णुमार्गीची सकळ सिद्धी|जाणता तू एकत्र शुद्धी| निवृत्ती होसी॥७॥
नामदेव म्हणे ऐसे लळें| पाळिले तयाचे गोपाळें|देऊनिया समाधिसोहळे| विष्णुधर्म प्रतिष्ठिला ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग