वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

जैसे दावी तैसा राहे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079210 · अभंग क्र. १०२०

1020.
जैसे दावी तैसा राहे । तरि का देव दुरी आहे ॥१॥
दुःख पावायाचे मूळ । राहाणी ठाव नाही ताळ ॥धृपद॥
माळामुद्रांवरी । कैचा सोंगे जोडे हरी ॥२॥
तुका म्हणे देखे । ऐसे परीची बहुतेके ॥३॥

अर्थ :
संत तुकाराम महाराज म्हणतात — जसा आपण बाहेरून दाखवतो तसा खरोखर आचरणात राहिलो, तर देव दूर राहणारच नाही (१); दुःख होण्याचे मूळ कारण म्हणजे आपल्या राहणीमध्ये ताळमेळ नसणे, म्हणजेच आचरण आणि विचार यामध्ये एकरूपता नसणे (धृपद); केवळ माळा घालून किंवा मुद्रा लावून बाह्य दिखावा केल्याने हरी मिळत नाही (२); तुकाराम महाराज म्हणतात — असे दिखाऊ वागणारे अनेक लोक मी पाहिले आहेत (३).

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग