वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

एकाएकी एकला काशीवासा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087908 · अभंग क्र. १०३१

1031.
एकाएकी एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वये प्रगटला ॥१॥
दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥
मुक्त मंडपामाझारीं निजनाम नगरी । दत्त प्रगटला कीर्तनामाझारी ॥३॥
भेटणें भेटी उठी दत्ता आली भेटी । सांगणें ऐकणे दत्त होऊनि उठी ॥४॥
कीर्तनी आतौता नाम श्रीदत्त दत्ता । निजकीर्ति ऐकोनि डोळे तत्त्वता ॥५॥
जळा सबाह्म आंतरी मनकर्णिका तीरीं । दत्त स्नान करी आत्ममुद्रेवरी ॥६॥
दत्त जंगमीं स्थावरी विश्वी विश्व धरी । तोचि दत्त घरोघरी नित्य भिक्षा करी ॥७॥
एका जनार्दनी दत्तवचनें देख । प्रपंच परमार्थ मीच चालवी एक ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग